top of page

कृष्णधन 

 

त्या तिजोऱ्यांच्या गर्भकोषी सांग तू आहेस का ?

त्या प्रकाशी महालांच्या ओतीसी तू तेज का ?

त्या नेत्यांच्या स्विसबँकी होऊनिया श्वेत का ?

वाहत लाचेच्या प्रवाहाने सांग तू आहेस का ?

 

भांडवलशाहीच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ? 

व्यापाराच्या सागराचे घोर ते तू रूप का ? 

जीवनी या तारणारा तू आशेचा किरण का ? 

गरजेअंती पावणारा तू दलालाचा डाव का ? 

 

जीवनी संजीवनी तू अपंग व्यवस्थेचे मुल का ? 

कष्टणाऱ्या बांधवांच्या डोक्यातले खूळ का ? 

मूर्त तू स्वार्थ का रे, बालकांचे भविष्य का ? 

या इथे अन त्या तिथे रे सांग तू आहेस का ? 

 

यतींद्र - २०१६

bottom of page