काळ्या पैसा काळ्या पैसा भागलास का ?

 

काळ्या पैसा काळ्या पैसा भागलास का ?

२००० च्या नोटेमधे लपलास का ?

२००० ची नोट रंगीबेरंगी 

नेत्यांची चाल अतरंगी 

 

खिशांतुन नेत्यांच्या बाहेर येउन जा 

गरिबांच नशीब उजळून जा 

रांगच रांग मोठी जगण्यासाठी 

रांगेतले भोळे शहीद देशासाठी 

 

जनता बिचारी रडत असेल

बँकांचा पारा चढत असेल 

कर्ज माफीत सटकून जाशील का ?

लाचारांना लटकून ठेवशील का ?

 

सर्व सामान्यांवर असा रुसलास का ?

तसा कसा तू लगेच संपणार का ?

छोट्या छोट्या गरजेतून परतणार तू नाहीस का ?

मेवाही गडगंजांचा खाणार तू नाहीस का ?

 

काळ्या पैसा काळ्या पैसा कुठे रे गेला 

सापडता सापडता हडप झाला 

हाकेला माझ्या ओ देशील का ? 

मुकाट्याने बाहेर येशील का ? 

 

आमच्याही वळणी येऊन जा 

पांढरा होऊन राहून जा 

बचत पडली तोंडघशी 

पाकीट राहीलं उपाशी 

- यातिंद्र - २०१६