
Y A T I N D R A S H I N D E
पारिजातक
.
पर्णात खेळते उन
बिलगून बागडून,
नेत्रांत माझ्या तू
कहर केलास
.
रम्य जन्मे क्षणोक्षणी
हि दृष्टी उरे निकामी,
सदैव उल्हास मनी
तुझ्या आठवणी
.
वदती स्वरश्रुती
तू बोलकी बासरी
जडली सूक्ष्म चित्ती
निव्वळ श्रवण्याती
.
अक्षत तेजलकांती
प्रज्वल कुशाग्र मनी
चक्षुतुनी उमडे ती
हृदय संजीवनी
.
अभिलाषा प्रसूती
उत्कट हतबल करसी
किती रहस्ये गुपित तुझ्या
नाजूक चांद्रमलमली
.
निरभ्र पहाटे भोवती
तू निळी झुळूक स्वच्छंद
गहीवरे अंगी मंद
अद्भुती भिजे अंतरंग
.
दाटती पुन्हा मेघ
बहरती कदंब निर्जीव
चिमण्यांचा कल्लोळ परी
सुक्या बाभळी वरती
.
दूर काळात जे दडले
त्याच्या विध्वौंसी न धजले
मूर्तीविण गाभार्यात वसले
आजही जागृत हे मंदिर
.
त्याचे ठायी श्वास तूझा
क्षणोक्षणी होई जिवंत
सत्यस्वप्न ओढीच्या त्या
अनुभूती किती दुष्ट सुंदर
.
कातडी सोलीत बोचती जसे
रेतीकण भीष्ण वादळांती
क्रौर्य त्या आर्त आठवणींचे असे
जीवघेणे पतन का आता समर्थासी
.
का ग लाभेल मला
मुकमरण तुझ्या विरहाती
यातनांच्या स्मशानासाठी
आता धरणीही सरती
.
अमर्त्य आत्म्याची
का ही दुर्दशा होती
जन्म होतील कैक पुढे
नसेन युती ह्या चित्त देहाची
.
अनंत पोकळीत निष्प्राण मी
तूज पाही उमलता ….
मजहृदयी चेतना ही ती
तव गंधप्रकाशाची ।
.
उमललीस पारिजातक तू गाभार्याती …
-यतिंद्र २०१६