
Y A T I N D R A S H I N D E
भगव्या प्राण तळमळला
ने मजसी ने परत सहिष्णुपर्वाला
रे भगव्या प्राण तळमळला,
अध्यात्माच्या त्यागरुपी तुज फडकता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी सुसंस्कृत गंगेत न्हाऊ, भरताची पुनर्गाथा गाऊ
तैं प्रजाहृद घात साशंकीतही झाले परी तुवा श्रीरामवचन तिज दिधले
भ्रष्टनाश हा मीच स्फुर्त करीन, त्रैलोकीश्रेष्ठ न्याय निरपेक्ष तुज देईन
समर्पिले मुग्धमन त्या तव केशर दिप्ती मी, वेदसिंधुरात्मयोगी सिद्ध बनुनी मी
या भेसळ भुमीं सत्यशोधिन मी, बध्दलो श्रुंगाराया ती लुप्त अस्मिता हिंदमातेला
भगव्या प्राण तळमळला ||
भुकतृष्णे अधीर निकृष्ट गिळावा घाशी, ही पोटदुखी झाली तैशी
जनाक्रोश हा सतत एैकुन कींव येती, दशदिशा घृणामय होती
कर्मामृत मी अर्पिले या भावे की तिने चिरसमृद्ध अभिषेकी न्हावे
जरी उदात्ते व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ पुळका संस्कृतीचा
ती सतरंगी घन एकता रे जनशक्त न्यायदेवी ती घटना रे
तो मुक्त विज्ञानकण्ठही माझा रे सतविवेकी हाय पारखा झाला
भगव्या प्राण तळमळला ||
देही गोत्रे बहुत एकी परि सत्वा, मम भरतभुमिचा आत्मा
धर्मगृहे येथे कुबेरधनी परि तिज तारी मानवतेची लेकरे सारी
त्यावीण नको दैव राज्य मज प्रिया साचा शुद्रानंद तिच्या जरि बंधुत्वाचा
सोसणे अबुध्द हे आता रे बहु भयावह दृश्यते भावी माता रे
तव चैतन्येसृजति जे तत्वां रे
त्वदविरहाची शपथ घालितो तुजला
भगव्या प्राण तळमळला ||
या पवनी आरुढुनी सळसळती निर्दया कैसा का वचन भंगिसी एैसा
त्वत्पावित्र्या सांप्रत जे मिरविते भिवुनी का दृढ्यैक्या ते
मन्मातेला द्रोही म्हणुनी विभाजती मज द्वन्द्वी अपराधी करीसी
तरि नवयुगैक्य भयभीतारे द्रोही न ती सुज्ञ जनता रे
कथिल हे शिवबाही आता रे ज्याने सार्वभौम जनकल्याणी हाती तुज धरला
भगव्या प्राण तळमळला ||
यतिंद्र - २०१७