top of page

दिव्योत्फुल्लित पद्मकंद

तळ्यागर्भी गाढ रुतलेली असंख्य उर्वर कंद 

कृश अंत:स्फुर्तीचे देठ उभे वा अंकुरी न्युनगंड ..

कळ्यांच्या त्या मनोरथी काहुरात गण्य ती फुलली कमळ |

नकळत कुठे अंतराळ उमलले क्वचितच ते अनंतात पोरके,

उमजले काहींनाच ते, नक्षत्रे निजलेले उत्कट असे हेच थोडके ..

कळ्यांसी असंख्य तारे कोमेजुन हृदयात, जे थडगयात राहीले खिन्न !

तळाशी कोठे दंभ पाषाणही स्थित, सावलीत ज्यांच्या विरुन कतिक यत्नांची रेती रखडती 

बुजली शंख, झिजली शस्त्रं, शेवाळली रिक्त शिंपलं ... परी अस्मिता कंकाली चिलखतं लकाकती ..

सारे अंधारातच दिव्य मात्र, येथे परिसही तेजतृष्णे विषण्ण ! 

 

काळगाळात फसलेले प्रकाशपुंज मातीतुनी पिकले आभासी,

संवेदना जागृत जिन्नसांची विकीर्ण ब्रम्हांड रांगोळी ..

अवकाशे मोकळीक लपंडावे प्रतिकुल, विवेक चेतनेने गाठिले मग कंदांचे सुक्ष्म !

छंदातुन हितगुज आणि ईच्छेतुन कंदाच्या संगीत त्यांचे प्रकटती, 

रुण धनातुन प्रेरीत, भ्रमातुन पसरीत त्याची उर्जा ते साकारती ..

वारुळ उधळुनी झळकावा अश्या तपस्वी प्रवासी, कंद राहीला मात्र एक पात्र !

 

मृगजळी वैराग्य खुणविती त्यास, एकांत चिथवे काय त्याचे महत्व, 

वाटणे तेही भाग्य, विस्मरलेल्या विवेक-चेतने विणा काय त्याचे अस्तित्व ..

फुलविणे कामच त्याचे, स्तरपरी प्रकाश ते ध्येय ... जिज्ञासा तो जन्म व तृप्ती तो अंत ! 

यतिंद्र -- २०१३ 

 

 

 

bottom of page